Municipal Election
sakal
नाशिक: भाजपविरोधात एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्धार करत महापालिकेच्या रणांगणात उतरलेल्या महाविकास आघाडीत अखेर बिघाडी उघड झाली आहे. जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे तब्बल आठ प्रभागांमध्ये आघाडीतीलच घटक पक्ष आमनेसामने उभे ठाकले असून, एबी फॉर्मच्या गोंधळाने आघाडीची रणनीतीच अडचणीत आली आहे.