Municipal Election
sakal
नाशिक: महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांनी युती जाहीर केली असली, तरी अद्यापही भारतीय जनता पक्षाकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे. त्यामुळेच जागावाटपाची घोषणा एक दिवस लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. युतीची घोषणा करून भाजपवर दबाव आणण्याचाही एक भाग मानला जात असून, युतीच्या घोषणेनंतर भाजप काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.