Nashik Municipal Corporation Election
sakal
नाशिक: महाविकास आघाडीच्या जागावाटपातील विस्कळितपणाने नाशिक महापालिका निवडणुकीत ‘मैत्रीपूर्ण लढत’ ही संज्ञा थेट आत्मघातकी ठरली. समन्वयाऐवजी सोयीचे उमेदवार उभे राहत गेल्याने आघाडीतील घटक पक्षांनीच एकमेकांची कोंडी केली. परिणामी १६० उमेदवार रिंगणात उतरवूनही आघाडीला अवघ्या १९ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष धक्का राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला बसला २९ जागा लढवूनही एकही जागा न मिळाल्याने त्यांचा सूपडा साफ झाला.