Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (ता.२९) व मंगळवार (ता.३०) हे दोनच दिवस शिल्लक राहिले, तरी अजूनही प्रमुख राजकीय पक्षांच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अखेरच्या क्षणापर्यंत तुल्यबळ उमेदवार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत; तर दुसरीकडे पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी थेट उमेदवारापर्यंत ‘एबी फॉर्म’ पोहोचवून त्यांना शांततेत अर्ज दाखल करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर महायुती, महाविकास आघाडीसह सर्वच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.