Nashik Municipal Corporation Election
sakal
नाशिक: महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकसाठी शुक्रवारी लागलेल्या निकालातून अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सातव्यांदा निवडणूक लढविणारे भाजपचे दिनकर आढाव, अरुण पवार, संभाजी मोरुस्कर, शशिकांत जाधव, शिवसेना पुरस्कृत माजी महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश सोनवणे, काँग्रेसच्या वत्सला खैरे यांचा पराभूतांमध्ये समावेश आहे. प्रभाग २९ मध्ये भाजपच्या एबी फॉर्म घोटाळ्यातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले मुकेश शहाणे, तर प्रभाग एकमध्ये अरुण पवार यांना पराभूत करणारे शिवसेनेचे प्रवीण जाधव जायंट किलर ठरले.