Nashik Municipal Election
sakal
नाशिक: ‘शंभर प्लस’चे उद्दिष्ट गाठता आले नसले, तरी नाशिककरांनी सातव्या पंचवार्षिक महापालिका कालावधीसाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या विकासनिष्ठ राजकारणालाच कौल दिला आहे. सलग दुसऱ्यांदा स्वबळावर निवडणूक लढवून बहुमताने सत्ता स्थापन करणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला. ७२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने महापौरपदावर भाजपचा दावा निर्विवाद झाला आहे.