Raj and Uddhav Thackeray
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते राज्यभर जोरदार प्रचार करीत असताना मुंबई आणि नाशिकसाठी युती केलेल्या उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिली संयुक्त सभा झाली. भाजपकडून सत्तेचा बाजार सुरू असल्याचा आरोप करीत दोन्ही भावांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले.