Traffic Diversion
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या मतदानानंतर दहा ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्राभोवती तीनस्तरीय कडेकोट सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच, वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी शुक्रवारी (ता. १६) मतमोजणी संपेपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक करावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले.