Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शांततेत प्रक्रिया सुरू असलेल्या मुंबई नाका परिसरातील अटल दिव्यांग भवनात मतमोजणीच्या अखेरच्या एक तासात कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’ झाला. प्रभाग ३० मध्ये ‘एमआयएम’चा उमेदवार निवडून आला म्हणून कार्यकर्त्यांनी हिरवा गुलाल उधळला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पक्ष- शिवसेना कार्यकर्त्यांची येथे गर्दी झाली. त्यांना दूर करण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. त्यामुळे काही काळ या भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.