Municipal Election
sakal
नाशिक: महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सध्या शहरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. प्रभागातील इच्छुक उमेदवारांचा समाजसेवकापासून ते नगरसेवकांपर्यंतचा प्रवास मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्यांना पंधरा ते अठरा हजारांपर्यंत निश्चित वेतन देण्यात येते.