Nashik election 2025 updates
Sakal
नाशिक: जिल्ह्यात पालिकांच्या निवडणुकीत मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राज्य निवडणूक आयोगाने सिन्नर, ओझर व चांदवड येथील सात जागांच्या निवडणुकीला रविवारी (ता. ३०) स्थगिती दिली.
त्यामुळे या जागांसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होणार नाही. उमेदवारी अर्ज बाद ठरविण्याच्या निर्णयाला काहींनी अपिलाद्वारे आव्हान दिले होते. मात्र, त्यावरील जिल्हा न्यायालयाचा निर्णय आलेला नसताना चिन्हवाटप झाल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.