महापालिका निवडणूक महिनाभर लांबणीवर पडणार

नाशिकला निवडणूक मार्चमध्ये होण्याची शक्यता
 election
electionsakal

नाशिक : इतर मागासवर्गीय वर्गाचे राजकीय आरक्षण, अडीच टक्के वाढीव लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांची वाढविण्यात आलेली संख्या या दोन्ही बाबी न्यायप्रविष्ट असल्याने आगामी महापालिकांचे निवडणुकीचे भवितव्य अधांतरी आहे. असे असले तरी नियोजित वेळेत निवडणुका झाल्यातरी पुढील वर्षात मुदत संपुष्टात येणार महापालिकांची निवडणूक किमान महिनाभर लांबणीवर पडणार असून, त्यात नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीऐवजी दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नाशिकसह राज्यातील बावीस महानगरपालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाबरोबरच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्य प्रभागरचना जाहीर करण्यात आली.

 election
Nashik | गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट, 6 गंभीर जखमी

कालांतराने निर्णय बदलत त्रिसदस्यीय प्रभागरचना घोषित करण्यात आली. त्यानंतर २०११ ते २०२१ या कालावधीमध्ये अडीच टक्के लोकसंख्या वाढली, असे गृहीत धरून निवडणूक होणाऱ्या महापालिकांमध्ये ११ ने नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आली. राज्य शासनाच्या बदलानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यास सुरवात केली. राज्य शासनाकडे आराखडा सादर देखील झाला, मात्र इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने दोनदा राज्य सरकारच्या विरोधात निकाल दिला.

निकाल देताना राज्य सरकारने जाहीर केलेले २७ टक्के आरक्षण न्यायालयाने रद्द ठरवत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इम्पिरिकल डाटा संकलित होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मंजूर केला. राज्य निवडणूक आयोगाकडे सदरचा प्रस्ताव सादर केला जाईल. राज्य निवडणूक आयोग शासनाच्या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेईल, हे सर्वोच्च न्यायालयात १७ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल. त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल. त्यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र न्यायालयाने नियोजित वेळेत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यास किमान एक महिना निवडणुका लांबणीवर पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 election
Nashik | गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट, 6 गंभीर जखमी

भाजपला अधिकचा कार्यकाळ

नाशिक महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे मार्चअखेरीस निवडणुका झाल्यास महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सत्तेचा संपूर्ण कार्यकाळ मिळेल.

नाशिकची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात

राज्यातील बावीस महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असल्या तरी एकाच वेळेस सर्व निवडणुका होणार नाही. निवडणुका घ्यायच्या ठरल्यास पहिल्या टप्प्यात यापूर्वी प्रलंबित असलेल्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. कोल्हापूर, वसई- विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली महापालिकांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुदत संपुष्टात येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील निवडणुका फेब्रुवारी महिन्यात, तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होतील. दोन्ही टप्प्यांमधील निवडणुकांमध्ये ४५ दिवसांचे अंतर राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com