नाशिक महापालिकेला रेमडेसिव्हिर इंजेक्शन उसनवारीवर घेण्याची वेळ

महापालिकेला पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयासमोर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी (Remdesivir Injection) हात पसरावे लागले आहेत
Remdesivir
RemdesivirGoogle
Updated on

नाशिक : गेल्या पंधरवड्यापासून लस उपलब्ध नसल्याने उसनवारीवर लस घेण्याची वेळ आलेल्या महापालिकेला पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयासमोर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी (Remdesivir Injection) हात पसरावे लागले आहे. महापालिकेच्या (Municipa Corporation) बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयामध्ये पाच दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शन नसल्याने ही वेळ आली आहे. (municipal hospital has not had remdesivir injections for five days Nashik News)

मायलन कंपनीला ५००० इंजेक्शनची ऑर्डर

१६ जानेवारीपासून महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. मात्र पंधरा दिवसांपासून लस पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने मोहिमेला ब्रेक लागला आहे. अडखळत सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयाकडून साडेआठ हजार डोस उसनवारीवर घेण्याची वेळ आली होती. आता पुन्हा महापालिकेला रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी जिल्हा रुग्णालयासमोर हात पसरावे लागत आहे. महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालय व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पाच दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. महापालिकेने मायलन कंपनीला ५००० इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. परंतु कंपनीकडून विलंब होत असल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी महापालिकेने जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. महापालिकेला इंजेक्शन प्राप्त झाल्यानंतर पुन्हा परत केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Remdesivir
नाशिकमध्ये सामान्यांना मागे ठेवून नातेवाईकांना डोस; आरोग्य केंद्रातील प्रकार

महापालिकेने एप्रिल महिन्यांमध्ये १०००० रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी केले पुन्हा नव्याने ५००० इंजेक्शनची ऑर्डर मायलन कंपनीला देण्यात आली आहे, परंतु कंपनीकडून पुरवठा न झाल्याने जिल्हा रुग्णालयाकडून इंजेक्शन घेतले जाणार आहे.

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

(municipal hospital has not had remdesivir injections for five days Nashik News)

Remdesivir
नाशिक रोडला पिस्तूलधारी सराईतांची चौकडी जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com