Crime
sakal
नाशिक: बोधलेनगर परिसरातील सुयोगनगरमध्ये मोलमजुरी करणाऱ्या दोन भावांमध्ये भंडाऱ्याचा प्रसाद घरी आणण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत होऊन धाकट्या भावाने सख्ख्या मोठ्या भावाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. उपनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित धाकट्या भावाला अटक करण्यात आली.