Nashik Crime: भायगाव शिवारातील संविधान नगरात तरुणाचा खून | Murder of youth in Constituent Town of samvidhan nagar Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Nashik Crime: भायगाव शिवारातील संविधान नगरात तरुणाचा खून

Nashik Crime : मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सतीश श्रावण मोरे (वय २७, रा. वामनदादा कर्डक चौक, पंचशीलनगर) या तरुणाला संविधान नगरमधील काही तरुणांनी जबर मारहाण केली.

शनिवारी (ता.३) रात्री हा प्रकार घडला. लाथाबुक्क्यांनी, गुप्ती व चॉपरने मारहाण केल्याने त्याचा रविवारी (ता.४) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात महिन्याभरातील खूनाची ही दुसरी घटना आहे. (Murder of youth in Constituent Town of samvidhan nagar Nashik Crime)

येथील सतीश मोरे हा तरुण हळदीच्या कार्यक्रमानिमित्त संविधान नगरमध्ये गेला होता. हळदीच्या कार्यक्रमात काही तरुण मित्राला मारहाण करीत असल्याने भांडण सोडविण्यासाठी सतीश गेला.

यावेळी भांडण करणाऱ्या तरुणांनी सतीश यालाच मारहाण करण्यास सुरवात केली. संशयितांनी गुप्ती व चॉपरने सतीशवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला नातेवाइकांनी तत्काळ उपचारासाठी सामान्य रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपचार सुरु असताना रविवारी (ता.४) दुपारी सतीशचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून फरार झालेल्या संशयितांचा पोलिस शोध घेत आहे.

नातेवाइकांकडून घोषणाबाजी

उपचारादरम्यान सतीशचा मृत्यू झाल्याने सतीशच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलजवळ संशयितांना तत्काळ अटक करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत संशयितांना अटक होत नाही.

तोपर्यंत आम्ही पार्थिव ताब्यात घेणार नाहीत अशी भूमिका सतीशची बहिण व नातेवाइकांनी केली. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.