धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H33671
धुळे : म्युझिकल योगा ग्रुपतर्फे आयोजित गरबा स्पर्धेतील विजेत्यांच्या सन्मानप्रसंगी सन्मानार्थींसह ग्रुपचे सदस्य.
---
म्युझिकल योगा ग्रुपतर्फे
गरबा स्पर्धा विजेत्यांचा सन्मान
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : म्युझिकल योगा ग्रुपतर्फे आयोजित गरबा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आला. विजेत्यांना मानचिन्ह, मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
म्युझिकल योगा ग्रुपतर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त कालिका मंदिरासमोरील परिसरात योगाभ्यासानंतर नऊ दिवस उपस्थित सदस्यांनी एकत्रितपणे आई भगवतीच्या चरणी गरब्याच्या माध्यमातून भक्तिसेवा अर्पण केली. भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम साधत सकल विश्वाच्या शांतीसाठी आदिशक्तीची आराधना या उपक्रमातून करण्यात आली. या नऊ दिवसांत गरबा सादरीकरणातून उत्साह, समन्वय आणि भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या स्पर्धकांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला गटातून सपना सोनवणे आणि पुरुष गटातून करण मारवाडी यांनी सातत्यपूर्ण व उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांना मानचिन्ह, मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमात प्रीत घुंडीयाल हिने आदिशक्तीचा आकर्षक वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. रूपाली चित्ते यांनी केले. दरम्यान, कौजगिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात दुग्ध प्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी गुड मॉर्निंग म्युझिकल योगा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
---