सटाणा- पहलगाम येथे दशहतवादी हल्ल्यात २६ भारतीय निष्पाप नागरीकांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येचा निषेध करीत येथील मुस्लीम समाजातर्फे शहरात कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.