Ashadhi Wari : रहीमच्या अंगणात रामाचा निवास; धार्मिक सौदार्हाचे प्रतीक

Warkari
Warkariesakal

जुने नाशिक : ' रहीमच्या अंगणात रामाचा निवास ' अशा प्रकारचे चित्र संत निवृत्तिनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Maharaj Palakhi) सोहळ्यानिमित्त काझीपुरा परिसरात बघावयास मिळाले. येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरात पालखीचे आगमन होताच मुस्लिम बांधवांनी (Muslim) यांच्या घरासमोरील अंगण वारकरी (Warkari) भाविकांसाठी खुले करून दिले. त्यांनीदेखील वास्तव्य करत काही वेळ विश्रांती घेतली. (Muslim helped Warkari devotees for kirtana Ashadhi Wari Nashik News)

संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखीचे काझीपुरा भागातील संत नामदेव विठ्ठल मंदिरात आगमन झाले. येथील विशेषतः: म्हणजे मुस्लिमबहुल भागात पालखीचा मुक्काम असतो. पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी बांधवांची विविध पद्धतीने येथील मुस्लिम बांधवांकडून सेवा केली जात असते. काही दिवसापासून देशभरात दोन्ही समाजात तेढ निर्माण करून अशांतता पसरविण्याचे काम सुरू आहे. अशा वातावरणात या वर्षीदेखील येथील हिंदू- मुस्लिम बांधवांनी आपली परंपरा कायम ठेवत पालखी सोहळा उत्साहात संपन्न केला. मंगळवारी (ता. १४) दुपारी काझीपुरा येथे पालखी दाखल झाली. धार्मिक परंपरेनुसार मंदिरात आरती, तसेच परिसरात भजन कीर्तन झाले.

मंदिराची जागा कमी असल्याने अनेक वारकरी बांधवांसाठी मुस्लिम बांधवांनी आपले अंगण खुले करून दिले. त्या ठिकाणी बसून त्यांनी प्रसादाचा लाभ घेतला. काही वेळ भजन कीर्तन करत विश्रांती घेतली. त्याचप्रमाणे भाविकांना पाणी पुरविण्यापासून आवश्यक विविध गोष्टी उपलब्ध केल्या. असे घडत असताना या ठिकाणी केवळ धार्मिक एकोप्याचे दर्शन घडून आले. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालणारे दृश्य याठिकाणी अनुभवास मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांकडून देण्यात आल्या.

Warkari
नाशिक : शहर तलाठ्याला लाच घेताना अटक

"आमचे कुटुंबीय शंभर वर्षांपासून मंदिर समोरील घरात वास्तव्यास आहे. त्यामुळे बालपणापासूनच हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन या ठिकाणी अनुभवास मिळाले आहे. त्यामुळे आजही पालखी आगमनापूर्वी आम्ही सर्वजण परिसराची स्वच्छता करतो. वारकरी बांधवांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सज्ज असतो. आजही सकाळपासून त्याच कामात व्यस्त होतो."

- मोहिनोद्दीन शेख मुस्लिम बांधव

"धर्मास राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र पालखी सोहळा करत असतात. भविष्यातही या ठिकाणी अशाच प्रकारे एकोपा बघावयास मिळेल." - इम्तियाज शेख

"देशात कसेही वातावरण असू द्या, आजही या ठिकाणी धार्मिक एकोपा जपला जात आहे. अनेक वर्षांपासून हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र येत पालखी सोहळा उत्साहात पार पाडत आहे. यंदादेखील परंपरेनुसार सोहळा झाला." - ऋषिकेश काळे

"धर्म समाजाच्या नावावर युवकांची दिशाभूल केली जात आहे. युवकांनी अशा कुठल्याही गोष्टींना बळी पडू नये. जाती- धर्मात भेद न करता माणुसकी जपावी. जुने नाशिक येथील पालखी सोहळा एकतेचे प्रतीक आहे." - अभिषेक मोटकरी

Warkari
मालेगावात जोरदार पावसाची हजेरी; वीजपुरवठा खंडित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com