MVP Election : रिंगणात आजपासून ‘हाय व्होल्‍टेज ड्रामा’

MVP election Latest Marathi News
MVP election Latest Marathi Newsesakal

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याच्‍या प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्‍लक राहिलेले असताना मंगळवार (ता. ९)पासून निवडणूक रिंगणात हाय व्होल्‍टेज घडामोडी बघायला मिळतील.

समाजपरिवर्तन पॅनलकडून अर्ज दाखल करत मेळावा घेतला जाणार आहे. प्रगती पॅनलकडून बुधवारी (ता. १०) अर्ज दाखल केला जात असल्‍याने शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. दरम्‍यान, येत्‍या दोन दिवसांत लढतीचे चित्रदेखील स्‍पष्ट होऊ शकणार आहे. (MVP Election High Voltage Drama from today nashik Latest marathi news)

मविप्र निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनल व विरोधात असलेले समाज विकास पॅनल यांच्‍यातर्फे आपापल्‍या स्‍तरावर मेळावे, सभांचा धडाका सुरू आहे. गुरुवार (ता. ११)पर्यंत उमेदवारी अर्ज विक्री व इच्‍छुकांना अर्ज दाखल करण्याची मुदत असेल.

येत्‍या तीन दिवसांमध्ये संस्‍थेच्‍या मध्यवर्ती इमारतीत असलेल्‍या निवडणूक कार्यालयात लक्षणीय गर्दी होणार आहे. दरम्‍यान, सोमवारी (ता. ८) दिवसभरात कार्यकारिणीसाठी १५१, तर सेवक सदस्‍यपदाकरिता आठ असे एकूण १५९ अर्ज दाखल झालेले आहेत. आतापर्यंत पदाधिकारी व सदस्‍यपदाकरिता ४९० आणि सेवक सदस्‍यपदासाठी ३४ असे ५२४ अर्ज विक्री झालेले आहेत.

दिलीप पाटील यांचा ऋणनिर्देश सोहळा

नांदगावला मातोश्री लॉन्स येथे संचालक दिलीप पाटील यांचा ऋणनिर्देश सोहळा झाला. या वेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक हेमंत वाजे, नानासाहेब महाले, माणिकराव शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार, अनिल आहेर आदी उपस्थित होते. दरम्‍यान, प्रगती पॅनलतर्फे बुधवारी (ता. १०) अर्ज दाखल केला जाणार असल्‍याने शक्तिप्रदर्शनाची तयारीदेखील सुरू आहे.

समाजविकासचा आज मेळावा

मंगळवारी समाजविकास पॅनलतर्फे ॲड. नितीन ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली पॅनलमधील इच्‍छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. यानंतर दुपारी एकला गंगापूर नाका परिसरातील धनदाई लॉन्‍स येथे जिल्‍हा मेळावा घेत शक्‍तिप्रदर्शन केले जाणार आहे.

सरचिटणीस पवारांसह संचालकांनी नेले अर्ज

सोमवारी मविप्र संस्‍थेच्‍या सरचिटणीस व प्रगती पॅनलच्या नीलिमाताई पवार, माणिकराव बोरस्‍ते यांनी उमेदवारी अर्ज नेला. सोबतच कार्यकारिणीतील संचालकपद भूषविलेले नाना महाले (नाशिक), सचिन पिंगळे (नाशिक), डॉ. प्रशांत देवरे (सटाणा) यांच्‍यासह माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल (चांदवड),

केदा आहेर (देवळा) यांच्‍यासह विश्‍वासराव मोरे (निफाड), रमेशचंद्र बच्‍छाव (मालेगाव), देवराम मोगल (निफाड), राजेंद्रनाथ पवार (कळवण), दिलीप दळवी (सटाणा), प्रवीण जाधव (दिंडोरी), सुरेश कमानकर (निफाड), राजेंद्र डोखळे (निफाड), डॉ. जयंत पवार (मालेगाव), रायभान काळे (येवला), दत्तात्रय पाटील (दिंडोरी) आदींनी अर्ज घेतले.

MVP election Latest Marathi News
तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी MSRTCतर्फे 230 बस

यांनी दाखल केले अर्ज

सोमवारी अध्यक्षपदासाठी सुरेश वडघुले, दिलीप मोरे यांनी अर्ज दाखल केले, तर डॉ. जयंत वाघ यांनी उपाध्यक्ष, उपसभापती, चिटणीसपदासाठी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी सचिन वाघ यांनीही अर्ज भरला असून, सभापतिपदासाठी दिलीप मोरे, उपसभापतिपदासाठी किशोर कदम, सचिन वाघ यांनी अर्ज दाखल केले.

याशिवाय राजेंद्रनाथ पवार (कळवण-सुरगाणा), शिवाजी गडाख, सचिन वाघ, सुभाष कारे, विजय कारे (निफाड), सुधाकर निकम, डॉ. जयंत पवार (मालेगाव), रामहरी संभेराव (येवला), विवेक पवार (सेवक सदस्‍य प्राथमिक व माध्यमिक) यांनी अर्ज दाखल केले.

अवघ्या ८६ सभासदांनी नेली घटना, ८८ जणांनी नियमावली

निवडणुकीनिमित्त कार्यालयात संस्‍थेची घटना, नियमावलीसह निवडणुकीकरिता मतदारयादी विक्री केली जाते आहे. एकीकडे इच्‍छुकांचा पाऊस असल्‍याने अर्ज खरेदीला प्रतिसाद मिळतो आहे. विक्री झालेल्‍या अर्जांची संख्या पाचशेवर गेलेली असताना, घटना, नियमावलीसह मतदारयादी खरेदीला प्रतिसाद अत्‍यल्‍प आहे. आतापर्यंत ८६ सभासदांनी घटनेची प्रत, ८८ जणांनी नियमावली, ४१ उमेदवारांनी मतदारयादीचा संपूर्ण संच, तर ६० जणांनी तालुका याद्या खरेदी केलेल्‍या आहेत.

MVP election Latest Marathi News
पेव्हर ब्लॉक प्रकल्पाला अडचण कोणाची?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com