Nashik News: वीजनिर्मितीत MVP होणार स्‍वयंपूर्ण; Solar Park किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍पाची चाचपणी

MVP in Solar project
MVP in Solar projectesakal

नाशिक : राज्‍यातील दुसऱ्या क्रमांकाची व नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी शैक्षणिक संस्‍था असलेल्‍या मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था कार्यकारिणीकडून महत्त्‍वपूर्ण बदलाची तयारी सुरू आहे.

संस्‍थेच्‍या शाखांना लागणारी वीज लक्षात घेता, सोलर पार्क उभारणी किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍प उभारण्याबाबत चाचपणी सुरू आहे. (MVP in power generation will be automatic Testing of Solar Park or Branch wise solar power projects Nashik News)

या माध्यमातून मविप्र संस्‍था वीजनिर्मितीत स्‍वयंपूर्ण करण्याचे प्रयत्‍न केले जाणार आहेत. जिल्‍हाभर संस्‍थेच्‍या सुमारे साडेचारशेहून अधिक शाखा आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये यांसह वैद्यकीय महाविद्यालये, व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचा समावेश आहे.

अगदी पाच हजार रुपयांपासून तर लाखो रुपयांपर्यंतचे मासिक वीजबिल या शाखांना त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या वापरानुसार येत असते. संस्‍थेच्‍या वैद्यकीय महाविद्यालयाशी रुग्‍णालय संलग्‍न असल्‍याने येथे विजेची अखंडित व मोठी गरज लक्षात घेता येथे सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपये वीजबिल येत असते.

या धर्तीवर संस्‍थेला विजेबाबत स्‍वयंपूर्ण करताना खर्चात कपात करणे, अक्षय ऊर्जा वापरून पर्यावरण संवर्धनात हातभार लावणे असे विविध उद्देश साध्य केले जाणार आहेत.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

MVP in Solar project
Nashik News : ...जेव्हा स्वामिनारायण मंदिरात शिरतात अतिरेकी!

कार्यकारिणीला विचारूनच निर्णय

कार्यकारणी पदाधिकारी व तालुका संचालक यांच्‍यासमोर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. साधारणतः पंधरा एकर जागेत एकाच ठिकाणी सोलर पार्क उभारणे किंवा शाखानिहाय स्‍थानिक स्‍तरावर सोलर पॅनल उभारून विजेची गरज भागविणे असे दोन पर्याय ठेवले जाणार आहेत. सर्वानुमेते निर्णय घेतला जाणार असल्‍याचे सांगण्यात आले.

"काटकसरीचे धोरण अवलंबिताना संस्‍थेच्‍या शाखांना लागणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्‍न असेल. या माध्यमातून संस्‍थेची बचत करताना अक्षय ऊर्जा वापरातून पर्यावरण संवर्धनाचा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे. कार्यकारिणीसमोर याबाबत लवकरच प्रस्‍ताव ठेवला जाईल." - ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

MVP in Solar project
Fire Accident : वर्षभरात शहरात 404 आगीच्या घटना; खोडसाळपणा म्हणून केलेल्या 9 खोट्या घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com