NAFED’s Role in Onion Purchase and the Price Trend in Maharashtra : नाशिकमध्ये नाफेडने कांदा खरेदी थांबवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, आता त्यांचे लक्ष बांगलादेशमधील कांदा निर्यातीकडे लागले आहे.
नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत ‘नाफेड’ने राज्यातील २५ केंद्रांवर एक लाख ४३ हजार क्विंटल कांद्याची खरेदी पूर्ण केली आहे. उद्दिष्टपूर्ती झाल्याचे सांगत आता यापुढे कांदा खरेदी करण्यात येणार नसल्याचे ‘नाफेड’ने स्पष्ट केले आहे.