Nashik Onion Purchase: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ची खरेदी देखावाच! केंद्राची जाहिरात, मात्र दोनच केंद्रे सुरू

onion
onionesakal

Onion Purchase: निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव दोन ते अडीच हजारांनी कोसळल्यानंतर केंद्र सरकारने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून सुरू केलेल्या खरेदीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. (Nafed NCCF only 2 centers are open for buying onion nashik news)

‘एनसीसीएफ’ने तीन हजार रुपये भाव जाहीर केला असला तरी केंद्रच अर्धवट सुरू केल्यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीतच कांदा विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून खरेदी सुरू केली.

‘एनसीसीएफ’ने निफाड, चांदवड, नामपूर, मालेगाव, उमराणे, पिंपळगाव, मुंगसे, लासलगाव, विंचूर, ताहाराबाद, दाभाडी, देवळा येथे खरेदी केंद्रे जाहीर केली. पण यातील दोनच केंद्रांनी खरेदी सुरू केली आहे. त्यातही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये भाव सांगितला जात असला तरी प्रत्यक्षात लासलगाव बाजार समितीच्या भावाची सरासरी काढून दर निश्चित केला जात आहे.

‘एनसीसीएफ’ने जाहीर केलेल्या फोन क्रमांकावर शेतकरी फोन करून माहिती विचारतात. त्यांना दरासाठी दुसऱ्या व्यक्तीचा नंबर दिला जातो. शेतकऱ्यांना वेगळी माहिती आणि कांदा पुरवठा करणाऱ्या संस्थांना वेगळी माहिती दिली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

onion
Nashik Onion Purchase: ‘एनसीसीएफ’तर्फे कांद्याची 3 हजारांनी खरेदी सुरू; जिल्ह्यात 12 केंद्रे

त्यामुळे ‘एनसीसीएफ’च्या माहितीत तफावत असून, प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर गेल्यानंतर केंद्रच बंद आढळते. अद्याप खरेदीला सुरवात केलेली नसल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच कांदा विक्रीसाठी आणावा लागत आहे.

कांदा दोन हजारांच्या आत

लाल कांद्याचे दर आता पंधराशे ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या आठवड्यात अडीच हजार ते तीन हजार ९०० रुपये दराने विकलेला कांदा आता कमी दराने विकण्याची वेळ आली आहे. लाल कांदा जास्त दिवस साठवला जाऊ शकत नसल्याने याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी दर घसरवल्याचा शेतकरी संघटनांनी केला आहे.

onion
Nashik Onion Purchase : नाफेड, एनसीसीएफचा कांदा गेला कुठे? गौडबंगालचा शेतकऱ्यांचा आरोप, फायदा नेमका कुणाला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com