लासलगाव- केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत नाफेड लवकरच कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करणार आहे. काही आठवड्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. या पार्श्वभूमीवर नाफेडच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दराला काही प्रमाणात स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे.