नगरसूल (ता. येवला)- येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील नगरसूल व परिसरातील अनेक गावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची सेवा गेल्या शनिवारपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या मुख्य केबल वाहिनीत बिघाड झाल्यामुळे दूरसंचार सेवा बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.