Crime
sakal
कोरोना काळात लॉकडाउन असल्याने शहरे सुनसान होती. अशातच नागपूरच्या सीताबर्डी भागातील एका हॉटेलमध्ये कुजलेला मृतदेह आढळून आला. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ५० वर्षीय कामगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हॉटेल बंद असल्याने मालकाला काहीही माहिती नव्हती. सीताबर्डी पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत यांनी कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना दिशा ठरवून कसून तपास केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या.