Nashik | रामकुंड नव्हे रामतीर्थ!; ‘नमामि गोदा’ प्रकल्प रेंगाळतोय कागदावरच

godavari river
godavari riveresakal

नाशिक : शहरातून वाहणारी गोदावरी नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ हा प्रकल्प केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे महापालिकेतर्फे राबविला जाणार आहे. प्रकल्प अहवाल तातडीने सादर करा, तत्काळ मंजुरी देण्याचे आश्‍वासन जलशक्ती मंत्रालयातर्फे देण्यात आले होते. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त केली जाणार आहे.

मात्र महापालिकेचे घोडे सल्लागार संस्थेवर अडून राहिले असून, सव्वा वर्षे उलटले तरी अद्याप संस्था नियुक्त न झाल्याने प्रशासकीय पातळीवरच प्रकल्पाबाबत अनास्था दिसून येत आहे. महापालिकेत सत्तेत राहिलेल्या भारतीय जनता पक्षासाठी प्रकल्प महत्त्वाचा आहे. निवडणुकीत या प्रकल्पावरून राजकारण रंगणार आहे. किमान केंद्र सरकारकडे अहवाल सादर होणे अवश्यक आहे. (namami goda project report of 1 thousand 803 crore prepared but not considered Nashik Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वाराणसी येथे गंगा नदीववर ‘नमामि गंगा’ प्रकल्प राबविण्यात आला. त्यात नदी स्वच्छतेबरोबर सौंदर्यीकरण करण्यात आले. त्याच धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदीचे रूपडे पालटण्यासाठी ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेत सत्तेत राहिलेल्या भाजपने तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेत प्रकल्पासाठी एक हजार ८२३ कोटी रुपये निधीची मागणी केली.

जलशक्ती मंत्रालयाने मागणीला तत्काळ प्रतिसाद दिला. श्री. शेखावत यांचे अतिरिक्त सचिव राजेंद्रसिंह यांनी महापालिकेला पत्र पाठवून ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागातर्फे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. ऑगस्ट २०२१ मध्ये ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी केंद्राकडून सूचना आल्या. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे सव्वा वर्षात प्रकल्पाचे काम कागदावर रेंगाळले आहे.

प्रकल्प तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करावी लागणार आहे. संस्थेची नियुक्ती झाल्यानंतर किमान सहा महिने काम करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर केंद्राला अहवाल सादर केला जाईल. पुढे केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होईल. तेथून पुढे कामाच्या निविदा काढण्यापासून ते कंत्राटदार नियुक्त करण्यापर्यंत प्रकल्प आकाराला येण्यास किमान तीन वर्षाचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.

godavari river
Bike Riding at Night : त्र्यंबकरोडवर रात्री रंगतो ‘धुमस्टाईल’ बाईकराईडचा थरार!

काय आहे प्रकल्पात?

- गोदावरी प्रदुषणमुक्ती

- नदीत मिसळणारे गटारींचे पाणी थांबवणार

- नव्या गटारी टाकण्याबरोबर जुन्या गटारींची दुरुस्ती

- मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण व क्षमतावाढ

- कारखान्यांच्या सांडपाण्याचा पुनर्वापर

- गोदाघाट विकास व सौंदर्यीकरण

"‘नमामि गोदा’ प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिकची जीवनवाहिनी गोदावरीचे पुनरुज्जीवन होणार आहे. केंद्र सरकारने मागणीची तातडीने दखल घेतली. महापालिका प्रशासनाकडून मात्र संथ गतीने काम सुरू आहे." - सतीश कुलकर्णी, माजी महापौर

"केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठी तत्परता दाखविण्यात आली. परंतु प्रशासकीय पातळीवर विलंब होत आहे. प्रदुषणमुक्तीसह गोदावरी सौंदर्यीकरणासाठी जवळपास अठराशे कोटींचा निधी प्राप्त होणार असताना प्रशासनाकडून लावला जाणारा विलंब दुर्दैवी आहे."

- गणेश गिते, माजी सभापती, स्थायी समिती, नाशिक महापालिका

godavari river
Nashik : रामतीर्थावर भिकाऱ्यांची वाढती गर्दी; निवाराशेडची व्यवस्था असूनही वापर नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com