सीसीटीव्ही कॅमेरे फोडले

सीसीटीव्ही कॅमेरे फोडले
Published on: 
नामपूरच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे फोडले नामपूर : इंदिरानगर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समाजकंटकानी शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचे उघडकीस आले आहे. दीपावलीच्या सुट्टीत अ ज्ञातांनी शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याने पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींमध्ये संताप आहे. शैक्षणिक संस्थांच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शाळेला सुट्टा असल्या तरी सोमवारी (ता. ९) शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा असल्याने मुख्याध्यापक भरत कापडणीस, उपशिक्षक विनोद सावंत सकाळी शाळेत आले असता, शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांनी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर संशयितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य शरद पवार, सामाजिक कार्यकर्ते राजू पठाण, राकेश भदाणे, मंदा माळी, हेमराज शिरसाठ, मनोज हरळे, लियाकत शहा, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर चौहान आदींनी निवेदन दिले. नामपूर : सीसीटीव्ही तोडफोडप्रकरणी पोलिसांना निवेदन देताना ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.