नाशिक- नामको बँकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६५ कोटी ३८ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. या वर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा मानस असल्याची माहिती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी दिली. .बँकेचे सन्माननीय सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक यांनी केलेले सहकार्य तसेच बँक व संचालकांवर दाखविलेला विश्वास यामुळे बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबद्दल अध्यक्ष भंडारी व सर्व संचालकांनी सर्वांचे आभार मानून बँकेची मार्च २०२५ अखेरची आर्थिक परिस्थिती सादर केली. बँकेच्या सर्व स्तरात लक्षणीय वाढ झाली आहे. .बँकेचा या वर्षी एकूण व्यवसाय तीन हजार ७६१ कोटी २५ लाख (ठेवी २४३९.०१ + कर्ज १३२२.२४) इतका झाला आहे. ढोबळ एनपीए सध्या ४.४० टक्के असून, निव्वळ एनपीए ०.०० टक्के आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय आर्थिक वर्ष २०२६ अखेर पाच हजार कोटींवर नेण्याचा व या वर्षी सभासदांना १५ टक्के इतका लाभांश देण्याचा मानस आहे..उपाध्यक्ष सुभाष नहार, जनसंपर्क संचालक सपना बागमार, ज्येष्ठ संचालक वसंत गिते, हेमंत धात्रक, विजय साने, महेंद्र बुरड, गणेश गिते, भानुदास चौधरी, नरेंद्र पवार, हितेंद्र (आकाश) छाजेड, प्रकाश दायमा, हरीश लोढा, ललितकुमार मोदी, अविनाश गोठी, अशोक सोनजे, प्रफुल्ल संचेती, रंजन ठाकरे, देवेंद्र पटेल, शीतल भट्टड, प्रशांत दिवे, तानाजी जायभावे, संकेत पारख व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.