नमो ड्रोन दीदी’ प्रियांका मोहिते यांनी पॅरिसमध्ये भारताची मान उंचावली

नमो ड्रोन दीदी’ प्रियांका मोहिते यांनी  पॅरिसमध्ये भारताची मान उंचावली
Published on: 
PML26B10269 पॅरिस ः जागतिक व्यासपीठावर भारताच्या वतीने ‘नमो ड्रोन दीदी’ म्हणून सहभागी झालेल्या प्रियांका मोहिते --------- ‘नमो ड्रोन दीदी’ प्रियांका यांनी पॅरिसमध्ये उंचावली देशाची मान ------------ आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व --------------- सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.२५ ः येथील ‘इफको’च्या ‘नमो ड्रोन दीदी’ प्रियांका ऋषिकेश मोहिते यांनी पॅरिस येथे झालेल्या ‘सियाल पॅरिस फूड बिझनेस २०२६’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा गौरव वाढवला. भारत सरकार आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) कडून विशेष निवड झाल्यानंतर त्यांना भारतीय कृषी क्षेत्रातील आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरणाची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्याची संधी मिळाली. मूळच्या सांगली जिल्ह्यातील असलेल्या प्रियांका यांच्या आई अंगणवाडी सेविका तर पती कृषी सल्लागार आहेत. एका सामान्य गृहिणीपासून ते प्रशिक्षित ड्रोन पायलट आणि ‘नमो ड्रोन दीदी’ असा त्यांचा प्रवास ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. पॅरिस दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘डीडी इंडिया’ आणि ‘युरोन्यूज’च्या माध्यमातून आयोजित फ्रेंच परिषदेत भाग घेऊन भारतीय शेतीतील आधुनिकता आणि महिलांच्या वाढत्या सहभागावर प्रकाश टाकला. याशिवाय आयटीपीओचे अध्यक्ष जावेद अशरफ यांच्यासोबत कृषी ड्रोनच्या प्रभावी वापरावर आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. या यशाबद्दल त्यांनी भारत सरकार, आयटीपीओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पिंपळगाव बसवंत ते पॅरिस असा हा प्रवास केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, तंत्रज्ञानाच्या बळावर जागतिक ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय ग्रामीण महिलांच्या सामर्थ्याचे प्रतीक मानले जात आहे. ---------------
Marathi News Esakal
www.esakal.com