कळवणमध्ये साकारण्याच्या दिशेने ''नमो उद्यान '' मनोरंजन , व्यायाम आणि निसर्गसंवर्धनाचा अनोखा संगम..

कळवणमध्ये साकारण्याच्या दिशेने ''नमो उद्यान ''     मनोरंजन , व्यायाम आणि निसर्गसंवर्धनाचा अनोखा संगम..
Published on: 
पान तीन मेन ----------------- 09910, 09906 कळवण : गणेशनगर भागातील नमो उद्याना’चे प्रगतीपथावर असलेले काम व दुसरं छायाचित्रात उद्यानाचे संकल्पचित्र . कळवणमध्ये मनोरंजन, व्यायाम, निसर्गसंवर्धनाचा संगम गणेशनगरमध्ये ‘नमो उद्यान’चे काम प्रगतीपथावर; सौंदर्यात पडणार भर रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. १८ : वाढत्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक मोकळ्या जागा आणि उद्यानांची गरज ओळखून कळवणमधील गणेशनगर परिसरात ‘नमो उद्यान’ साकारण्यात येत आहे. पुंजाराम पाटील कॉलनीतील नवकार असोसिएट्सजवळील मोकळ्या जागेत हे उद्यान विकसित होत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने आणि प्रगतीपथावर आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले व ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी एक हक्काची आणि सुंदर जागा उपलब्ध होणार आहे. तसेच परिसराच्या वैभवात व सौंदर्यात मोठी भर पडणार शहरात नुकत्याच पार पडलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी आमदार नितीन पवार यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या अध्यक्षतेखाली या ''नमो उद्यान'' कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता प्रत्यक्ष उभारणीचे काम पुढे सरकत आहे. येथील स्वच्छता आणि हिरवाईचे संवर्धन यामुळे हे ‘नमो उद्यान’ कळवण शहराचे एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ‘नमो उद्याना’ची प्रमुख वैशिष्ट्ये आकर्षक प्रवेशद्वार, सुरक्षेसाठी कक्ष, मध्यवर्ती छत्रमंडप व सुबक पायवाटांची रचना, अंकांवर आधारित खेळ, स्मरणशक्ती वाढविणारे खेळ. योग, प्राणायाम आणि व्यायामासाठी स्वतंत्र जागा. ज्येष्ठांसाठी विरंगुळा, संवादासाठी कट्टा. बुद्धिबळ, लुडो यांसारख्या बौद्धिक खेळांसाठी विशेष सोय. दिव्यांगांसाठी रॅम्प, आधारासाठी रेलिंग व व्हीलचेअर सहज वावरू शकेल असे पुरेशा रुंदीचे मार्ग. विविध ऋतूंमध्ये सदाहरित राहणारे आणि निवारा देणारे वृक्षलागवड. प्रकाशयोजना व पावसाच्या पाण्याचा निचरा. -------- ‘नमो उद्यान’ नागरिकांच्या विरंगुळ्याचे एक सुंदर केंद्र ठरणार असून, कळवणला एक सुंदर व स्वच्छ शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कौतिक पगार, नगराध्यक्ष, कळवण गणेशनगर आणि पुंजाराम पाटील कॉलनी परिसरासाठी ‘नमो उद्यान’ ही एक अत्यंत मोलाची सुविधा ठरणार आहे. नागरिकांच्या सर्व अपेक्षा विचारात घेऊन उभारण्यात येणारे हे उद्यान या भागातील नागरिकांसाठी वरदान ठरेल." गौरव पगार, नगरसेवक, कळवण परिसराजवळच असे अत्याधुनिक उद्यान साकारत असल्याचा मनस्वी आनंद आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना विरंगुळ्यासाठी उत्तम जागा मिळेल. मनिष पाटील, स्थानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.