येवल्यात प्रत्येक प्रभागात नमो उद्यान उभारण्यास प्राधान्य द्या समीर भुजबळ : पटेल कॉलनीत नमो उद्यानाचे लोकार्पण

येवल्यात प्रत्येक प्रभागात नमो उद्यान उभारण्यास प्राधान्य द्या समीर भुजबळ : पटेल कॉलनीत नमो उद्यानाचे लोकार्पण
Published on: 
पान-३ मेन फोटो-27020 येवला : पटेल कॉलनीत नमो उद्यानाचे लोकार्पण करताना माजी खासदार समीर भुजबळ. शेजारी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व पदाधिकारी. प्रत्येक प्रभागात नमो उद्यान उभारावे समीर भुजबळ : येवल्यात पटेल कॉलनीत लोकार्पण सोहळा सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ५ : शहरातील पटेल कॉलनी परिसरात सुंदर आणि सोयी-सुविधा असलेले पहिले नमो उद्यान उभारण्यात आले आहे. हा येवल्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. संपूर्ण शहरातील सर्व नागरिकांना या उद्यानाचा लाभ मिळावा, यासाठी प्रत्येक प्रभागात नमो उद्यान उभारण्यास प्राधान्य द्यावे, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले. शहरातील पटेल कॉलनीत साकारलेल्या नमो उद्यानाचे भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. ब्राह्मकृमारी नीतादीदी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, पारुल गुजराथी, मुख्याधिकारी तुषार आहेर, निसार शेख, डॉ. महेश्वर तगारे, मकरंद सोनवणे, बांधकाम अभियंता गणेश आंधुरे आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, की नमो उद्यानाच्या रूपाने येवल्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. शहर कुस्ती, पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. शहरासाठी नवीन येसगाव पाणीपुरवठा योजना, येवला-पिंपळस रस्ता, मनमाड येवला कोपरगाव रस्ता चौपदरीकरण, मांजरपाडा प्रकल्प, चिंचोडी औद्योगिक वसाहत यांसह अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण करण्यात आली तसेच अनेक कामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामे करत असताना नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. नाशिकच्या धर्तीवर शहरात घंटागाडी सुविधा देऊन शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात नमो उद्यान उभारण्यासाठी प्राधान्य द्यावे. येवला शहर स्वच्छ सुंदर व प्रगतिशील होईल, यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. भुजबळ यांनी उद्यानाची पाहणी करून विविध सूचना केल्या. नगरसेवक जावेद लखपती, छाया क्षीरसागर, अमजद शेख, शेख परवीन बानो, जयाबाई जाधव, लक्ष्मीबाई जावळे, महेश काबरा, कुणाल परदेशी, लक्ष्मीबाई साबळे, चैताली शिंदे, वकील शेख, अक्षय परदेशी,सुनील पैठणकर, दीपक गायकवाड, गणेश गवळी आदी उपस्थित होते. ........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com