Nashik News: नामपूर बाजार समिती निवडणूक विश्लेषण; सत्ताधाऱ्यांचे विमान क्रॅश, मनमानीला लागला ब्रेक!

Nampur Bazaar Committee Election Analysis
Nampur Bazaar Committee Election Analysis esakal

नामपूर : येथील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने पंधरापैकी सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवून प्रतिस्पर्धी बळीराजा पॅनलचे विमान क्रॅश केले. सत्ताधारी संचालक मंडळाच्या मनमानी गैरकारभाराविरुद्ध शेतकरी विकास पॅनेलच्या नेत्यांनी नियोजित प्रचार केल्याने विजयाची माळ शेतकरी विकास पॅनेलच्या गळ्यात पडली.

निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असला तरी भविष्यात बाजार समितीचे कामकाज करताना नवनिर्वाचित संचालक मंडळाची कसोटी लागेल. बाजार समितीचा निकाल अपेक्षित लागला असला तरी पराभूत झालेल्या उमेदवारांना आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे.

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीवर परिणाम करणारी निवडणूक म्हणून निकालाकडे पाहिले जात आहे. (Nampur Bazaar Committee Election Analysis Ruling plane crash arbitrariness broke Nashik News)

सटाणा बाजार समितीचे विभाजन झाल्यानंतर २०१८ मध्ये नामपूर बाजार समितीची पहिल्यांदा पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. यात मोसम खोऱ्यातील ९३ गावांमधील सुमारे पन्नास हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला होता.

परंतु यंदा पूर्वापार पद्धतीप्रमाणे सहकारी सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य आदींना मतदानाचा अधिकार मिळाल्याने लक्ष्मीदर्शनाची मोठी पर्वणीच मतदारांना मिळाली.

भटक्या विमुक्त जाती-जमाती गटात आखतवाडे येथील अपक्ष उमेदवार अरुण वाघ यांनी माजी संचालक, कोटबेलचे पोलिसपाटील साहेबराव कांदळकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

त्यांची निशाणी कुकर असल्याने मतदारांना थेट कुकर वाटपाचा अनोखा फंडा वापरल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून अनेक कामांमध्ये दिरंगाई झाल्याने संचालक मंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याबाबत एका माजी सभापतींनी सोशल मीडियात बाजार समितीच्या कामकाजाचे वाभाडे काढले होते.

विद्यामन संचालक मंडळातील चार संचालकांना यंदा मतदारांनी नाकारले. त्यात बाजार समितीचे माजी सभापती शांताराम निकम, हेमंत कोर, माजी उपसभापती लक्ष्मण पवार, डी. डी. खैरनार यांचा समावेश आहे.

राजकीय डावपेच आखून शेवटच्या क्षणापर्यंत पॅनल निर्मितीत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. निवडणूकीतील तुल्यबळ समजल्या जाणाऱ्या दोन पॅनेलच्या नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याने अनेक प्रबळ इच्छुकांना निवडणुकीच्या आखाड्यातून माघारी फिरावे लागले. यंदाच्या निवडणुकीत दोन पॅनेलच्या बरोबरीने अपक्षही निवडणूक रिंगणात होते, हे विशेष!

Nampur Bazaar Committee Election Analysis
Nashik News: महिला शेतकऱ्यांनी बनविले 15 हजार लिटर सेंद्रीय जीवामृत स्लरी!

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारमहर्षी जयवंतराव सावंत गटाचे नेते विलास सावंत, यतीन पगार यांच्यात मनोमिलन झाल्याने सर्वसमावेशक शेतकरी विकास पॅनेलची निर्मिती झाली.

दोन्ही गट एकत्र आल्याने शेतकरी पॅनेलची बाजार समितीत सत्ता आली आहे. अंतिमक्षणी प्रतिस्पर्धी रयत क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा पॅनेलमध्ये आजी-माजी संचालकांसह अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली.

माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे अशोकदादा सावंत आदींनी बळीराजा पॅनेलला पाठिंबा दिला. परंतु सारदे येथील बांधकाम ठेकेदार सयाजी देवरे यांचा अपवाद वगळता बळीराजा पॅनेलचे विमान कोसळले.

व्यापारी गटात सुरुवातीला मोठी रस्सीखेच होती. किराणा व्यापारी भरत मुथा, ताहाराबादचे कांदा व्यापारी प्रशांत चौधरी यांची वर्णी लागली. हमाल/मापारी गटात मतदानाच्या एक दिवस आधी दोघा उमेदवारांमध्ये समझोता झाल्याने प्रशांत देवरे विजयी झाले.

महिला राखीव प्रवर्गात मनीषा पगार, मंगला कापडणीस यांनी पॅनलप्रमुख दीपक पगार यांच्या पत्नी हर्षदा पगार, अनुबाई जोपळे यांचा पराभव केला.

ग्रामपंचायत गटात टेंभे वरचे येथील उच्चविद्याविभूषित लोकनियुक्त सरपंच किरण वाघ, द्याने येथील उपसरपंच, निवृत्त ग्रामविकास अधिकारी कारभारी (केपी नाना) कापडणीस मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सोसायटी सर्वसाधारण गटात शेतकरी विकास पॅनेलचे नंदू कोर पराभूत झाले.

विजयी झालेल्यामध्ये सहकारमहर्षी जयवंतराव सावंत गटाचे नेते विलास सावंत, इजमाने येथील लोटन धोंडगे, उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते आकाश भामरे, शिक्षक समितीचे नेते पंकज भामरे, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष युवराज पवार, दसवेलचे माजी उपसरपंच संदीप निकम यांचा समावेश आहे.

इतर मागास प्रवर्गात गिरीश भामरे यांनी माजी उपसभापती लक्ष्मण पवार यांचा सुमारे २०० मतांनी पराभव केला.

आर्थिक दुर्बल गटात करंजाडचे युवानेते राकेश देवरे यांनी विद्यमान संचालक डी.डी.खैरनार यांचा ९३ मतांनी पराभव केला. अनुसूचित जाती/जमाती गटात जामोटीचे पोपट ठाकरे यांनी गणपत पवारांचा ११८ मतांनी पराभव केला.

Nampur Bazaar Committee Election Analysis
Nashik News: चणकापूर शंभर टक्के भरले! मालेगाव शहरास 52 गावांचा पाणीप्रश्‍न सुसह्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com