Crime
sakal
नामपूर- नाशिक: नामपूर- मालेगाव रस्त्यावरील अंबासन (ता. बागलाण) फाट्यावर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून अवैध लाकडाची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले. या कारवाईमुळे लाकडांची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाने दोन्ही टेम्पो आणि लाकूड जप्त करून, टेम्पो मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.