नामपूर: मोसम खोऱ्याची प्रमुख व्यापारी बाजारपेठ असल्याने नामपूरला झपाट्याने नागरिकीकरण होत असून, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सोयी-सुविधा मात्र मिळत नाहीत. ही या भागातील नागरिकांची अडचण आहे. त्यामुळे लोकसंख्या, आर्थिक उत्पन्न, नववसाहतीमधील प्रचंड गैरसोयी आदी बाबींचा विचार करून नामपूरला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.