नामपूर- येथील सटाणा रस्त्यालगत एस ताराचंद यांच्या कांद्याच्या शेडजवळ मोटारसायकल आणि कांदा विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात खिरमाणी (ता. बागलाण) येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.