नामपूर- गेल्या काही वर्षापासून इंग्रजी भाषेतून प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी खेडोपाडी इंग्रजी शाळेची क्रेझ निर्माण झाली आहे. मोसम खोऱ्याची मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने नामपूर शहर इंग्रजी माध्यमाच्या शाळाचे माहेरघर बनले आहे. परंतु शहरातील एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला शासनाची मान्यता नसल्याने शहरातील सर्व आठ शाळा अनधिकृत असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील दोन शाळांनी परस्पर स्थलांतर केल्याने अनधिकृत शाळेत त्यांचा समावेश झाला आहे.