नाना पाटेकरांनी सामाजिक कार्यातून माणुसकी जोपासली

नाना पाटेकरांनी सामाजिक कार्यातून माणुसकी जोपासली
Published on: 
(टुडे पान एक अँकर) --- NSK26H31856 नंदुरबार : श्रद्धांजली सभेस उपस्थित बी. एस. पाटील, शशिकांत घासकडबी, रणजित राजपूत, सुलभा महिरे, पत्रकार अभिषेक राजपूत, अभिनेते विजय पवार, डॉ. संदीप बोरसे, डॉ. माधव कदम, नागसेन बोरसे आदी. --- नानांनी कलेसोबतच सामाजिक कार्यातून माणुसकी जोपासली पाटेकरांना अभिवादन : श्रद्धांजली सभेत मान्यवरांच्या भावना सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ११ : आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि सामाजिक कार्यातून माणुसकीची बांधिलकी जपणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नंदुरबार येथे श्रद्धांजली सभा झाली. सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या कलात्मक प्रवासाचे, सामाजिक योगदानाचे आणि नंदुरबार जिल्ह्याशी असलेल्या त्यांच्या नात्याचे स्मरण केले. नानांनी कलेसोबतच सामाजिक कार्यातून माणुसकी जोपासल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील यांच्याहस्ते नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य बी. एस. पाटील म्हणाले, की नाना पाटेकर यांचे योगदान केवळ कला आणि अभिनय क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य केले. आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह समाजोपयोगी कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यातून त्यांची समाजाप्रति असलेली संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना दिसून येते. नंदुरबार जिल्ह्याशी त्यांची नाळ जोडलेली होती. या वेळी प्रकाश मच्छले यांनी नाना पाटेकर व मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनासोबत कशी नाळ जोडली होती याबाबत त्यांनी अनुभव सांगत श्रद्धांजली व्यक्त केली. या वेळी साहित्य भारतीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी, रणजित राजपूत, सुलभा महिरे, पत्रकार अभिषेक राजपूत, अभिनेते विजय पवार, डॉ. संदीप बोरसे, डॉ. माधव कदम, डॉ. खुशालसिंग राजपूत, दिनेश वाडेकर, अरुण सोनार, दिलीप सोलंकी, जितेंद्र खवळे, राहुल इंदवे यांनी मनोगतातून भावना व्यक्त केल्या. नाना पाटेकर यांच्या अभिनयातील ताकद, विविध भूमिकांमधून त्यांनी साकारलेले वास्तव आणि समाजासाठी कार्य करण्याची त्यांची प्रेरणा यांचा उल्लेख मान्यवरांनी केला. या वेळी नागसेन पेंढारकर यांनी ‘वजूद’ चित्रपटातील ‘कैसे बताऊँ मैं तुम्हें...’ हे गीत सादर केले. गीताच्या माध्यमातून नानांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. जिभाऊ करंडकचे आयोजक तथा बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर व श्रीराम दाऊतखाने यांनी या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी लायन्स क्लबचे अनिल पाटील, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कुंवर, काशीनाथ सूर्यवंशी, कुणाल वसईकर, गिरीश वसावे, बालरंगभूमी परिषद नंदुरबारचे कार्याध्यक्ष मनोज सोनार, सहकार्यवाहक राजेश जाधव, कुणाल वीर, सय्यद इसरार अली, क्षमा वासे- वसईकर, ललिता पाटील, टी. टी. ठाकूर, कैलास मराठे, विनोद चौधरी, पवन चौधरी, आशिष कापडणीस यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागसेन पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम दाऊतखाने यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com