Nashik Crime : नाशिक हादरले! मुलांच्या खेळण्यावरून वाद; तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
Minor Dispute Turns Violent in Nanavali, Nashik : लहान मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ कारणावरून वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
जुने नाशिक- नानावली येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ कारणावरून वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. सोमवारी (ता. ३०) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रजा फिरोज शेख (वय १६) हा युवक गंभीर जखमी झाला.