(टुडे पान एक मेन लिड करावा)
फोटो : NSK26H34149
नंदुरबार : रॅलीत सहभागी झालेल्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, शहादा उपनगराध्यक्षा माधवी पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, डॉ. हीना गावित, डॉ. सुप्रिया गावित आदी.
--------------
नंदुरबारला विराट रॅलीतून सामाजिक एकात्मतेचा जागर
सरदार पटेल जयंतीनिमित्त आयोजन : सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : देशाचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. गुजर लेवा पाटीदार पटेल समाजातर्फे एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात रॅली काढण्यात आली.
या वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह भारत माता, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी आमदार पी. के. अण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी एकता रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. रॅलीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, अखिल भारतीय गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील, माजी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, डीवायएसपी हनुमंत गायकवाड, नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, नगराध्यक्ष अभिजित पाटील, शहादा पालिकेच्या उपनगराध्यक्ष माधवी पाटील, प्रा. मकरंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, प्रीती अभिजित पाटील, मनपाचे गटनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक राऊ मोरे, डॉ. समिधा नटावदकर, नगरसेविका भावना शितल पटेल, ज्योती पाटील, गुजरातचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष महेंद्र पटेल, जगदीश पटेल, प्राचार्य डॉ. लतेश चौधरी यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे सदस्य, जय सरदार वल्लभभाई पटेल फाऊंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीत सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कार्याचे फलक झळकवण्यात आले. रथावर सरदार वल्लभभाई यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. आकर्षक देखावे, विविध घोषवाक्ये आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे फलक हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट परिसरातून सुरु झालेली रॅली नंदुरबार शहरातील उड्डाणपूल मार्गे, गांधी पुतळा, नेहरू पुतळा, जुनी नगरपालिका, नवी नगरपालिका, अंधारे चौकमार्गे डॉ. काणे हायस्कूल येथे रॅलीचा समारोप झाला. या वेळी नंदुरबार शहरातील हुतात्मा उद्यान येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्ध पुतळ्यास विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रॅलीत विविध देखावे
रॅलीत बँड पथकासह युवा वर्ग, ज्येष्ठ नागरीक आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भजनी मंडळांनी देखील सहभाग नोंदविला. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यातून सामाजिक एकात्मकतेचा संदेश देण्यात आला. यानिमित्त शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. व्हीएसजीएम परिवारातर्फेआयोजित शिबीरात ३० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. नंदुरबार शहरातील सरदार चौक मित्र परिवार आणि सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समितीतर्फेही रक्तदान शिबीर पार पडले. यात ४५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.