जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष शिबिरे

जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष शिबिरे
Published on: 
जिल्ह्यात आजपासून विशेष शिबिरे नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ता. १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे होणार आहेत. शिबिराचा पात्र नागरिक व नवमतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर, जास्तीत जास्त नागरित तसेच नव्या मतदारांसाठी ही विशेष मोहीम होत आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ असून, अंतिम मतदारयादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक केंद्रावर १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबरला विशेष नोंदणी शिबिर होणार आहे. ही शिबिरे सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहतील. शिबिराचा ज्या नागरिकांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा नवमतदारांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. मतदार यादीत नाव नोंदणी करणे, नाव वगळणे किंवा पत्ता बदलण्याबाबतचे दावे व हरकती अर्ज संबंधित केंद्रावर जाऊन थेट सादर करता येणार आहेत. नवमतदारांनी जवळच्या केंद्रांत जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com