नांदगाव: मृत्यू अंतिम सत्य... पण त्यालाही सन्मान न मिळाल्याचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य मंगळवारी (ता. २६) रात्री नांदगावच्या मुख्य स्मशानभूमीत घडले. पथदीप बंद, दिव्यांची चोरी आणि कायमस्वरूपी अंधाराचे साम्राज्य याच सावल्यांमध्ये एका जिवाचा निरोप घेण्याची वेळ आली.