Vitthal Gaikwad
sakal
बोलठाण: जातेगाव (ता. नांदगाव) येथे कौटुंबिक हिंसाचाराचा कळस गाठणारी धक्कादायक घटना घडली. विठ्ठल तुकाराम गायकवाड (वय ५८) यांची त्यांच्याच मुलाने श्रीकृष्ण (सावता) विठ्ठल गायकवाड (वय २०) याने लोखंडी पाईपने डोके व तोंडावर घाव घालून खून केला. रविवारी (ता.४) रात्री ११.३० वाजता शेतालगतच्या घरात हा प्रकार घडला.