नांदगाव/मनमाड- शहराबाहेरून काढण्यात येणाऱ्या नियोजित बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वीच प्रस्ताव तयार करण्यात आला असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून त्याबाबतचा प्रकल्पीय आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच या प्रकल्पीय आराखड्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.