नांदगाव- लग्न सभारंभ आटोपून परतणाऱ्यामारुती एर्टिगाची समोरून येणाऱ्या मालवाहू तीन चाकी वाहनाला (अपे रिक्षाची )धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात पोखरी शिवारातील हायवेवर सानप मार्केट कमेटी परिसरात झाला मृत तिघे जण निफाड तालुक्यातील जळगाव व बोकडदरा येथील असून अन्य आठ जण जखमी आहेत. याबाबत ऍपेरिक्षा चालकाने एर्टिगा चा चालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.