फोटो ओळी- 11143
नांदगाव : अंडर पास (सब वे) मार्गाची पाहणी करताना रेल्वे अधिकारी, संतोष गुप्ता व नागरिक.
नांदगावला उद्या
‘रेल रोको’चा इशारा
नांदगाव : नांदगाव रेल्वे अंडरपास दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक नदीपात्रातील रेल्वे पुलाच्या मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र, या पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून, रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा शनिवारी (ता. १०) रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, स्टेशन प्रबंधक मारसाळे, अभियंता भूपेंद्र पाटील यांनी अंडरपासमधील कामाची पाहणी केली. शहरप्रमुख श्रावण आढाव व नागरिक उपस्थित होते
अंडरपास दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने नागरिकांना पुरेशी पूर्वसूचना दिली नाही तसेच वाहतुकीसाठी योग्य पर्यायी व्यवस्था केली नसल्याचा आरोप गुप्ता यांनी निवेदनात केला आहे. अंडरपास बंद असल्याने संपूर्ण वाहतूक रेल्वे पुलाच्या मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावर आधीच खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या वाहतूक व्यवस्थेचा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
..........