नांदगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १२ चोरीच्या मोटारसायकली जप्त! भवरी फाटा परिसरात पोलिसांची कारवाई;चार संशयित ताब्यात,३ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नांदगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १२ चोरीच्या मोटारसायकली जप्त!  भवरी फाटा परिसरात पोलिसांची कारवाई;चार संशयित ताब्यात,३ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Published on: 
02560 नांदगाव : चोरीच्या दुचाकी व संशयित यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे समवेत पोलिस पथक. नांदगावला चोरीच्या १२ दुचाकी जप्त चार संशयित ताब्यात; ३ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत सकाळ वृत्तसेवा बाणगाव बुद्रुक, नांदगाव ता. १७ : तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नांदगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरीचा संशय असलेल्या तब्बल १२ दुचाकी जप्त केल्या आहेत.या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नांदगाव ते येवला मार्गावरील भवरी फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान प्रशांत बाबासाहेब भवर, लक्ष्मण रामदास सोनवणे, बाळू किशोर मोरे आणि अक्षय किशोर मोरे या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती असतानाही त्यांची खरेदी-विक्री करण्याच्या व्यवहारात संबंधित संशयित सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे, सहाय्यक निरीक्षक सतिष गावित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार केशव सूर्यवंशी,पोलीस शिपाई अमोल नागरे,अनिल जाधव व रमेश सानप करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी नेमक्या कोणत्या ठिकाणांहून चोरीला गेल्या आहेत. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.