नांदगाव- चालत्या मालवाहू ट्रकमधून काही गोण्या खाली पडून अचानक मोठा आवाज झाला अन् त्यानंतर काळ्या धुळीचे लोट उठल्याने मोठी खळबळ उडाली. गुरुवारी (ता.२२) सायंकाळी साडे वाजता येथील मालेगाव रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात घडलेल्या या अजब प्रकाराने नागरिक बुचकळ्यात पडले. भीतीपोटी नागरिक सैरावैरा पळत सुटले. विविध उत्पादनांसाठी वापरण्यात येणारी ती पावडर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.