नाशिक- पुस्तक वाचनाचा छंद जडला की तो कसाही जोपासता येतो. मग तुम्ही कितीही व्यस्त असला, तरी त्यातून वेळ काढलाच जातो. अवघे दहावीचे शिक्षण झालेल्या शासकीय वाहनावरील निवृत्त चालकाने आपल्या सेवाकाळात जमविलेली एक हजाराहून अधिक पुस्तके वाचनालयांना दान केली आहेत. त्यांची ही कृती अभिमानास्पदच म्हणायला हवी.