पान-३ मेन करणे
NDM26B01329
नांदूरमध्यमेश्वर ः येथील धरणात सध्या असलेला मृतसाठा.
-----------------
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या साठ्यात घट
---------------
पाणी सोडल्याचा परिणाम, केवळ मृतसाठा, पक्षांचा अधिवास, पाणीपुरवठा योजना संकटात
-------------
सचिन वाघ ः सकाळ वृत्तसेवा
नांदूरमध्यमेश्वर, ता.१७ ः ब्रिटिश काळात बांधलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाणी सोडल्याने धरणाने तळ गाठला असून पात्र उघड पडले आहे. सध्या केवळ मृतसाठा असून धरणावर अवलंबून असलेल्या पाणीयोजनाही संकटात सापडल्या आहेत. महाराष्ट्राचे भरतपूर किंबहुना रामसर दर्जा प्राप्त येथील पक्षी अभयारण्यातील पक्षांचा अधिवासही धोक्यात आला आहे. या धरणात तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी नागरिक आणि पक्षीप्रेमींनी केली आहे. धरणात सप्टेंबरअखेर २५० दशलक्ष घनफूट एवढा साठा होता, सध्या केवेळ मृतसाठा शिल्लक आहे.
------------------
नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आता पक्षी येण्यास सुरुवात झाली असून देश विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत अगदी न चुकता परदेशी पक्षी दाखल होत असतात. नोव्हेंबरपासून येथे पर्यटकांची आणि पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्यांची गर्दी होत असते. मात्र यावर्षीची पाणी टंचाई, त्यात धरणातील पाणी खाली नदीपात्रात सोडून दिल्याने पाणथळ जागा कोरड्या पडल्या आहेत. परिणामी पक्षांना भक्ष्य शोधणे अवघड होत असल्याने त्याचा परिणाम पक्षी स्थलांतरावर होऊ शकतो. धरणातील जलपर्णी, मासे यांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे.
१६-१
कालव्यावरही पाणीयोजना
या धरणाच्या कालव्यावर देखील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सध्या असलेल्या मृतसाठ्यामुळे धरणाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. याच धरणात माशांच्या नानाविध प्रजाती आहेत. त्यामुळे येथे काही हौशी खास माशांवर ताव मारण्यासाठी येत असतात. धरण परिसरात त्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल निर्माण झाले आहेत. साहजिकच पाण्याअभावी येथील पक्षी अभयारण्याची ओळख पुसली जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभाग, वनविभाग आणि पक्षी प्रेमी यांनी समन्वय साधून नांदूर मध्यमेश्वर धरणात लवकरात लवकर पाणी कसे सोडले जाईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. धरणात आलेले पाणी दीर्घकाळ कसे साठवून ठेवता येईल याचा देखील विचार होणे गरजेचे असल्याचे पक्षिमित्रांचे म्हणणे आहे.
----------------------
१६-१ चौकट
अवलंबून असलेल्या पाणीयोजना
- लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना.
- बारागाव पिंपरी, निमगावसह तेरा गाव पाणी योजना.
- भेंडाळी महाजनपूर तळवाडे रामनगर या गावांच्या योजना
- चांदोरी, सायखेडा, पिंपळस, कोठुरे, म्हाळसाकोरे, निफाडसह
गोदाकाठालगतच्या सर्व गावांच्या पाणीपुरवठा योजना
----------
कोट
येथील पक्षी अभयारण्य परिसरात धरणातील पाणथळ भाग पूर्णपणे नाहीसा झाला आहे. पात्र कोरडेठाक पडले आहे. यापूर्वी अशी परिस्थिती कधी ओढवली नव्हती, मात्र धरणातून पाणी नदीपात्रात सोडल्याने त्याचा थेट परिणाम येथील पक्षांच्या जीवितावर होऊ लागला आहे.
- गंगाधर आघाव, पक्षीमित्र, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य.
----------------