Nandur Madhmeshwar Bird
sakal
नांदूरमध्यमेश्वर: थंडीची चाहूल लागताच रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश- विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे दाखल झाले असून, सध्या तब्बल ४८ हजार पक्ष्यांनी या परिसरात मुक्काम ठोकला आहे. यात ३५ हजार पाणपक्षी आणि १३ हजार गवताळ पक्ष्यांचा समावेश असून, अभयारण्य परिसर सध्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला आहे. पक्ष्यांची वाढती संख्या पाहता यंदा पर्यटकांची गर्दीही लक्षणीयरीत्या वाढली आहे.